अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या पत्नीच्या डोक्यात पतीने लाकडी दांडके मारल्याने ती जागीच ठार झाली. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास देवळाली प्रवरा परिसरातील आंबी स्टेशन येथे ही घटना घडली.
शनिवारी सकाळी बाबासाहेब विठ्ठल गोलवड याला पकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बाबासाहेब पत्नी शीतलकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत होता.
तिने नकार दिल्याने त्याचा राग अनावर झाला. जवळच पडलेले लाकडी दांडके उचलून त्याने शीतलच्या डोक्यात फटका मारला. हा मार जिव्हारी लागल्याने ती जागीच ठार झाली.
शीतल मेल्याचे लक्षात येताच बाबासाहेब पळून गेला. या घटनेची खबर मिळताच श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, राहुरीचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, उपनिरीक्षक सचिन बागूल, काॅन्स्टेबल टिक्कल, पठारे,
पारधी, आहेर यांनी शुक्रवारी रात्री घटनास्थळी धाव घेऊन आरोपीचा रात्रभर शोध घेतला, पण सापडला नाही. शनिवारी सकाळी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या
बाबासाहेबच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. शीतलचा भाऊ विजय बर्डे याने फिर्यादीवरून बाबासाहेबविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved