हॉटेलची तोडफोड करत दिली जीवे मारण्याची धमकी…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-  शहरासह जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढत चालली आहे, लूटमार, चोरी, धमकावणे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे.

नुकतीच राहुरी तालुक्यात हॉटेल चालवण्यास घेण्यावरून झालेल्या वादात हॉटेल चालकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, नगर-मनमाड रस्त्यावरील “तोरणा’ हॉटेलमध्ये मंगळवारी (ता. 6) रात्री साडेनऊ वाजता चार आरोपी आले.

“हे हॉटेल आम्हाला चालविण्यासाठी घ्यायचे होते, तुम्ही का घेतले..?’ असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली.

हॉटेलमधील तिघांना जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत प्रवीण विलास कोळसे (रा. मानोरी) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

राहुल ऊर्फ पप्पू गंगाधर कल्हापुरे (रा. देसवंडी), दादा कुलट, किरण कुलट व अमोल कुलट (तिघेही रा. वळण), अशी आरोपींची नावे असून, सर्व आरोपी पसार झाले आहेत.

दरम्यान या मारहाणीत निजाम पठाण, प्रमोद दसपुते व ऋषिकेश घोडके जखमी झाले असून, त्यांना नगरला हलविले आहे. दरम्यान,

चिंचोली येथे नगर-मनमाड रस्त्याच्या बाजूच्या एका हॉटेलमध्ये 15 दिवसांपूर्वी चौघांनी तरुणाला घातक शस्त्रांनी मारहाण केली होती. तशाच हल्ल्याची राहुरी शहरात पुनरावृत्ती घडली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe