श्रीगोंद्यात अवैध गुटखा विक्रीचा धंदा तेजीत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-  तालुक्यातील दोन्ही पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी काम करत असले तरी काही ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. तालुक्यातील

अवैध गुटख्याचा धंद्यावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाला फारसे यश आले नसल्याने विविध गावात गुटख्याच्या विक्रीत भाईचा हात धरण्यात यश येताना दिसत नाही.

टपऱ्यापर्यंत होलसेल दरात विक्रीस बंदी असलेला गुटखा पोहोच देणारी यंत्रणा असल्याने यात अनेक बेरोजगारांना रोजगार मिळत आहे.

त्यातच श्रीगोंदे शहरात एका ठिकाणी भाई साठा करून संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांच्या आशीर्वादाने गुटखा पोहाेच केला जात आहे, तर तो भाई कोण याबाबत चर्चेला उधाण आले.

परराज्यातून गुटखा विक्रीसाठी ग्रामीण भागात येत आहे. राज्यात बंदी असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, खर्रा इत्यादींची विक्री सुरू आहे.

परंतु पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन या विभागांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शेकडो पान टपऱ्यांवर सुगंधी सुपारी बरोबर मिक्स नावाने गुटखासदृश पदार्थ विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment