डॉ.बागूल यांच्या ई-टीचर क्लबचे पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-“कोरोना लॉकडाऊन प्रतिकूलता पार्श्वभूमीवर शिक्षण प्रवाहाला चालना देणाऱ्या ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व वाढले असून शिक्षकांना तंत्रस्नेही होणे आवश्यकच झाले आहे,यासाठी शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी पुढाकार घेऊन ई-टीचर क्लब या ऑनलाईन ई – शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन केल्यामुळे अनेक शिक्षकांना चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे.

“असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केले. यावेळी आमदार संग्राम जगताप,शिक्षणाधिकारी(माध्य.) रामदास हराळ, शिक्षणाधिकारी (प्राथ.)रमाकांत काठमोरे आदी उपस्थित होते.

बालवाडी ते बारावी पर्यंतचे कुठल्याही माध्यमाचे शिक्षक या क्लबमध्ये सहभागी होऊ शकतात तसेच यासाठी लॅपटॉप व कॉम्प्युटरची आवश्यकता नसून फक्त अँड्रॉइड मोबाईलवर या सर्व गोष्टी विनामूल्य शिकवल्या जात आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील विविध माध्यमातील सुमारे १५ लाखांपेक्षा अधिक शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले असून मराठी, सेमी, इंग्रजी,

हिंदी या माध्यमातून विविध उपक्रम पाठविले जातात. या क्लबमध्ये शिक्षकांना युट्युब, फेसबूक, व्हाट्सअपसह विविध शैक्षणिक ॲप,गुगलची माहिती व वापर,

गुगल फॉर्म,लॅपटॉप, मोबाईल, लर्निंग टॅबलेट याबरोबरच कॉलर माईक,डिजिटल पेन, बूस्टर स्पीकर, टेक्नो इंक आदी डिजिटल साहित्याचा वापर कसा करावा,

तसेच ऑनलाईन कसे शिकवावे, विविध शैक्षणिक वेबसाइट्स, तमन्ना, दीक्षा,निष्ठा, ई-पाठशाला, आय सी टी अभ्यासक्रम, स्वयंप्रभा,

फ्री ऑनलाइन एज्युकेशनचे स्वयं पोर्टल-ॲप्स, इंडिया सायन्स, उमंग, द टीचर, टेक्नो ,एनसीआरटी बुक्स, गूगल क्रोम स्टीकचा वापर,शिक्षामित्र,

क्यू आर कोड बनवणे झूम व गुगल मिट चा वापर, विविध सॉफ्टवेअरचा वापर इत्यादी तंत्रज्ञानविषयक घटकांबद्दल ऑनलाईन व ऑफलाईन मोफत मार्गदर्शन केले जाते.

आजपावेतो राज्यभरातील सुमारे २१४ शाळांचे प्रशिक्षण संपन्न झाले असून प्रशिक्षण, सराव व प्रात्यक्षिक असे अध्यापनाचे टप्पे असून उपक्रमात सहभागी होणाऱ्या शिक्षकास प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

या उपक्रमासाठी प्रत्येक शिक्षकाने टेलिग्राम नावाचे ॲप गूगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून खालील लिंक ओपन केल्यानंतर आपण टेलिग्राम ग्रुपमध्ये सहज जॉईन होऊ शकता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment