अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशात केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना घरातच राहावे लागत आहे; परंतु याच दरम्यान कौटुंबिक हिंसाचार प्रचंड वाढल्याचे धक्कादायक तथ्य मंगळवारी उजेडात आले आहे. नैराश्यग्रस्त पतींकडून पत्नींना मारहाण केली जात असून, या अत्याचारासंबंधी तब्बल २९१ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
तत्पूर्वी फेब्रुवारीमध्ये ३०२ आणि जानेवारीत २७० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे देशातील कुटुंबसंस्थेचा क्रूर चेहरा समोर आला आहे.लॉकडाऊनमुळे अख्खा देश सध्या ठप्प आहे. मागील २४ मार्चपासून नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केल्यामुळे सर्वच जण घरात अडकले आहेत;

परंतु या काळात घरातील महिलांचा छळ होऊ लागला आहे. पती आपापल्या पत्नींवर राग काढू लागले आहेत. यातून महिलांची सुटका होत नाहीय. त्यामुळे त्या कौटुंबिक जाचाच्या शिकार होत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात पतींनी रुद्रावतार धारण करीत महिलांचे शोषण सुरू केले आहे. प्रसंगी महिलांना जबर मारहाण केली जात आहे. त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला जात आहे. महिलांची उपासमार केली जात आहे, असे वृत्त प्रकाशझोतात आले आहे.
पतीच्या अत्याचारातून महिलांना पळ काढणेसुद्धा कठीण झाले आहे, असा सूर तज्ज्ञांनी काढला आहे. उत्तर भारतातील विशेषत: पंजाबमधील हजारो महिला पतीच्या क्रूरतेचा सामना करीत आहेत, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले.
घरी असल्याने पती नैराश्यग्रस्त होत आहेत. त्यामुळे ते पत्नीवर रुबाब गाजवीत आहेत. पंजाबमध्ये महिलाविरोधी कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे त्या म्हणाल्या. महिलांनी स्थानिक पोलीस किंवा महिला आयोगाकडे धाव घ्यावी, असे आवाहन शर्मा यांनी केले आहे.
दरम्यान, कोरोनामुळे देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. अशा स्थितीत १३० कोटी जनतेला घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या दरम्यान महिला मात्र पतींच्या जाचाचा सामना करीत आहेत. भारतासारख्या संस्कारशील देशात कुटुंब संस्थेसाठी कौटुंबिक हिंसाचार लाजिरवाणा असल्याचे मानले जात आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com