अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘प्रेमसंबंध ठेव’ म्हणत श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील असिफ कबीर पठाण या तरुणाने राहुरी विद्यापीठाच्या उजव्या कालव्याजवळ विवाहित महिलेवर धारदार शस्त्राने सपासप वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ती महिला गंभीर जखमी झाली. एखाद्या फिल्मी ‘लवस्टोरी’लाही लाजविणारी ही घटना रविवारी सायंकाळी घडली.
प्रेयसीवर धारदार सुऱ्याने वार करून फरार झालेल्या प्रियकराला पोलिसांनी गजाआड केले. हा तरूण हरेगाव येथील रहिवासी आहे. मंगळवारी न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. रविवारी सायंकाळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ ते मुळा धरण रस्त्यावरील पवारबाबा तलावाजवळ विद्यापीठ हद्दीत अंगावर चाकूचे वार झालेली महिला जखमी अवस्थेत आढळली होती.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन महिलेला नगर येथील रूग्णालयात दाखल केले होते. श्रीरामपूर येथील महिलेच्या भावाने सोमवारी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री आसिफ पठाण (वय ३०, राहणार हरेगाव) याला ताब्यात घेतले.
पठाण यानेच या महिलेवर चाकूचे वार केल्याचे स्पष्ट झाले. पठाणचे या महिलेशी प्रेमसंबंध आहेत. या दोघांत झालेल्या वादामुळे पठाण याने रविवारी दुपारी काळ्या पिवळ्या परमिट जीपमध्ये बसवून प्रेयसीला कृषी विद्यापीठ ते मुळा धरण रस्त्यावर आणले. प्रेयसीच्या डोक्यात, छातीवर, गळ्यावर, पोटावर धारदार सुऱ्याने वार करून पठाणने तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या कृत्याची कबुली पठाण याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पठाण अविवाहित असून ३५ वयाची महिला विधवा असल्याची माहिती मिळाली. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पठाण यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राक्षे करत आहेत. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com