अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- कोरोना संकटामुळे ग्रामपंचायतींसह अन्य निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता नव्याने नगरपंचायती व ग्रामपंचायतींच्याही प्रभागरचना व अद्ययावत मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्याने, तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
डिसेंबर मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची पारनेर तालुक्यामध्ये जोरदार तयारी सुरु झालेली आहे. पारनेर तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींपैकी 88 ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरअखेर संपत आहे.
तसेच, पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पारनेर नगरपंचायतीची मुदतही नोव्हेंबरअखेर संपणार आहे. पारनेर नगरपंचायत व तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने या वर्षी खऱ्या अर्थाने आमदार लंके व माजी आमदार औटी यांचा कस लागणार आहे.
आता या निवडणुकीत आमदार व माजी आमदार हे तालुक्यात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जोरदार पर्यंत करतील हे मात्र निश्चित. पारनेर हे औटी यांचे मूळ गाव आहे. त्यामुळे तेथे तर त्यांना आपले वर्चस्व सिद्ध करावे लागणार आहेच; मात्र आपल्या बालेकिल्ल्यात आमदार लंके यांना प्रवेश करण्यापासून रोखण्याचे मोठे आव्हान औटी यांच्यापुढे असेल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved