आमदार संग्राम जगताप मनपात !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची विविध प्रकारची देणी थकीत असल्याने आमदार संग्राम जगताप यांनी मनपात जाऊन उपायुक्त प्रदीप पठारे यांच्याशी चर्चा केली. थकीत देणे अदा करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही आमदार जगताप यांनी दिल्या.

मनपा कर्मचाऱ्यांना पाचव्या व सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम, पदोन्नत्या व त्यातील फरक अद्याप मिळालेला नाही. याबाबत आमदार जगताप यांनी महापालिकेला पत्र देऊन चर्चा केली. कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम देण्याबाबत कोणतीही बैठक घेण्याचा निर्णयदेखील यावेेळी घेण्यात आला.

दरम्यान, सारसनगर भागातील काही ले-आउटला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिक व विकासकांमध्ये अस्वस्थता आहे. यावर सुनावणी होणार असली, तरी नोटिसांबाबतही आमदार जगताप यांनी माहिती घेतली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment