अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : एका भाजपच्या मंत्र्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी मोदी, योगी समाजासाठी कलंक असल्याचं म्हणत घरचा आहेर दिला आहे.
आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटर करण्यात आला. यावर हे मंत्री बोलत असताना त्यांनी हि टीका केली असल्यासाचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.हा व्हिडीओ मध्य प्रदेशचे जलसंपदा मंत्री तुलसी सिलावट यांचा आहे.
मात्र हा व्हिडीओ एडिटेड असल्याची सारवासारव त्यांनी केली. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सिलावट आधी काँग्रेसमध्ये होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसचा हात सोडला. ते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं सिलावट अडचणीत आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसवर आरोप केले. आपल्या वक्तव्यातील शब्द मागेपुढे करून व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप सिलावट यांनी केला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews