फूट टाळण्याचा आमदार मोनिका राजळेंचा प्रयत्न

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पाथर्डी उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आमदार मोनिका राजळे यांचा निर्णय अंतिम असला, तरी सत्ताधारी आघाडीत फूट पडू नये म्हणून त्यांचेही कौशल्य पणाला लागणार आहे.

नगरपालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असून एकूण १७ पैकी १२ नगरसेवक सत्ताधारी गटाकडे आहेत. उपनगराध्यक्षपदाबाबत चार वर्षांपूर्वी ठरलेला फॉर्म्युला पाळत बजरंग घोडके यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला उशीर केला.

इच्छुक नगरसेवकांनी राजळेंचे लक्ष वारंवार वेधल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग घेऊन गूढ पद्धतीने घोडके यांनी राजीनामा दिल्याने आघाडीत फूट पडल्याची चर्चा रंगली. पालिकेच्या कारभाराबाबत तीन वेळा आमदारांनी नगरसेवकांची बैठक घेऊन नाराजी व्यक्त केली.

निवडक पदाधिकाऱ्यांची त्यांनी कानउघडणीही केली. निवडणुकीला सामोरे जाताना पालिकेचा चेहरा आकर्षक करण्यास नेत्यांकडून प्रारंभ होऊन त्याची सुरुवात उपनगराध्यक्ष निवडणुकीपासून ठरणार आहे. माजी नगराध्यक्ष नंदकुमार शेळके यांचे पारडे सध्यातरी जड आहे.

या पदावर आपली वर्णी लागावी, यासाठी रमेश गोरे यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. आमदारांच्या भेटीसाठी त्यांनी मुंबई गाठली. राजळे यांच्याकडून ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर होऊ शकतो. पालिकेतील राजकीय कुरघोड्यांमध्ये वाढ होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

पदाधिकारी निवडीत जातीय समीकरणांची उघड चर्चा सुरू आहे. काही इच्छुकांनी महाविकास आघाडीतील घनिष्ट संबंध असलेल्या मंत्र्यांशी संधान साधले आहे. माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी आखलेली रणनीति आमदारांकडून पडताळली जात आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment