अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- कंगना व शिवसेनेच्या वादाच्या पार्शवभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी मोठे विधान केले आहे.
देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळवण्यासाठीच कंगना प्रकरणाला हवा दिली जात आहे असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

कलाकारांनी सामाजिक भान जपलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती.
या वक्त्यव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. याच प्रकरणावर आता खासदार कोल्हे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात अनेक महिन्यांपासून लॉकडाऊन पुकारण्यात आला होता.
यामुळे देशाची आथिर्क परिस्थिती कोलमडली आहे. देशातील कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळवण्यासाठीच कंगना प्रकरणाला हवा दिली जात आहे.
त्याचा बोलविता धनी कोण आहे. हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या वक्तव्यावरूनच ते दिसून येत आहे, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. एखाद्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे.
कलाकारांनीही कोणत्याही गोष्टीवर भाष्य करताना सामाजिक भान जपलं पाहिजे, असं सांगतानाच देशात रोज हजारो केसेस सापडत आहेत. त्याचंही सर्वांनी भान राखलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













