अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-बोल्हेगावात पोलिस चौकीसाठी महानगरपालिकेने सांस्कृतिक हाॅलची जागा द्यावी, अशी मागणी नगरसेवक कुमार वाकळे यांनी महासभेत केली. महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी त्यास सहमती दर्शवली.
दरम्यान नगरसेवक कुमार वाकळे यांनी बोल्हेगाव परिसरातील गुन्हेगारीबाबत माहिती दिली. हा परिसर सुमारे ४० हजार लोकसंख्येचा असून बोल्हेगाव भाग तोफखाना, तर नागापूर भाग एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे.
प्रभाग सातमध्ये चाैकी करण्यास पोलिसांनी तयारी दर्शवली आहे. त्याला महापालिकेने ना-हरकत द्यावी, अशी मागणी वाकळे यांनी केली.
यावेळी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार म्हणाले, आपण जागा देऊ शकतो, पण नगररचना विभागाचे शेरे घेऊनच मान्यता देता येईल.
नगररचना विभागाचे सहायक संचालक राम चारठाणकर म्हणाले, ज्या उद्देशासाठी संबंधित हाॅल किंवा जागा असेल त्याच उद्देशासाठी ती वापरावी लागते.
परंतु अपवादात्मक स्थितीत आपल्याला जागा देता येईल. महापाैरांनी सहमती दर्शवल्यामुळे चाैकी होण्याची वाट मोकळी झाली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved