अहमदनगर : आ संग्राम जगताप यांना नगर दक्षिण साठी उमेदवारी मिळाल्याचे संकेत आ संग्राम जगताप यांनी स्वतः कार्यकर्त्यांना दिले आहेत. नगर दक्षिण उमेदवारी साठी आ. जगताप पिता पुत्रांमध्ये घोळ सुरु होता. पण आ. संग्राम जगताप यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ठ संकेत दिले आहेत.
त्या नुसार शहरातील राष्ट्रवादी चे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या नुसार आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या सर्व पदाधीकार्याची बैठक आ संग्राम जगताप यांनी बोलावली आहे.

काही दिवसापूर्वी सुजय विखे लोकसभेच्या तोंडावर भाजपात गेल्यानंतर त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळते या विषयी उलट सुलट चर्चा चालू होती. प्रथम मा कुलगुरू सर्जीराव निमसे यांचे नाव चर्चेत होते. त्या पाठोपाठ अनुराधा नागवडे , प्रशांत गडाख , आ. अरुण जगताप आणि आ. संग्राम जगताप यांच्या नावाला उधान आले होते.
दोन दिवसापूर्वी अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना अचानक भेटीसाठी बोलावल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी भवन येथे सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली होती.
ही बैठक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांनी बोलावली होती. जगताप यांना अचानक भेटीसाठी बोलावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.