नगर : रात्री झालेल्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी महिलेस शिवीगाळ, दमदाटी करत विटा व दगड फेकून मारहाण केली.
ही घटना दौंड रोडवरील विद्यानगर येथे रविवारी घडली. शीतल किरण सोनवणे (ज्ञानदीप कॉलनी, कडा, ता. आष्टी) यांचे दळवी कुटुंबीयांशी रात्री भांडण झाले.

मनात राग धरून जयदीप संताराम दळवी, संदिप संताराम दळवी, चारू जय दळवी, अंबादास गहिले व त्याची पत्नी (नाव माहीत नाही) या पाच जणांनी शीतल सोनवणे हिच्या आईस शिवीगाळ, दमदाटी करत विटा व दगड फेकून मारहाण केली. पोलिसांनी शीतल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.