श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथे मजुरी करणारा तरुण सुनील लक्ष्मण म्हसकर (वय ३३) याने सोमवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मढेवडगाव येथे तरुणाची आत्महत्या गळफास घेतल्याचा प्रकार घरातील मंडळींच्या लक्षात आल्यावर त्याला तातडीने दौडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दौंड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवून दौड़ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.त्याच्यामागे आई – वडील, पत्नी तसेच दोन मुले आहेत. पुढील तपासासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात येणार आहे.