अहमदनगर : पाथर्डी येथील एमएम निऱ्हाळी कॉलेज परिसरात २७ ऑगस्टला विद्यार्थ्यांमध्येच राडा झाला. मागील भांडणाचा राग मनात धरून एका विद्याथ्र्यास मारहाण करण्यात आली.
तसेच भांडणात मधे पडणाऱ्या शिक्षकालाही शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्गात खळबळ उडाली आहे. .

२७ ऑगस्ट रोजी फिर्यादी मुलगा कॉलेज सुटल्यानंतर गेटमधून बाहेर जात असताना मागील भांडणाच्या कारणावरून शाळेतीलच विद्यार्थी तेथे आले. ६ ते ७ विद्यार्थींनी संगणमत करून फिर्यादीला लोखंडी रॉडने मारले.
फिर्यादी विद्याथ्र्याच्या तोंडावर व उजव्या बरगडीवर मारहाण करण्यात आली. विद्यार्थ्यांचे भांडणे सोडविण्यासाठी दहावीचे शिक्षक मध्ये गेले असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. तसेच फिर्यादीस जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पुढील तपास सफौ. गोल्हार हे करीत आहेत.
दरम्यान कॉलेजमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येच भांडणे झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विद्यार्थी कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायला येतात की भांडायला येतात असाही सवाल केला जात आहे.
- Samsung Galaxy M16 5G आणि M06 5G लाँच होताच स्वस्तात विक्रीला Amazon वर बंपर डील्स
- Volvo XC90 नव्या रूपात येणार ! 25 KMPL मायलेज देणारी 7 सीटर SUV
- Nothing चा नवा गेमचेंजर ! CMF फोन 2 मध्ये तगडा प्रोसेसर आणि 50MP कॅमेरासह लॉन्च होणार
- 200MP कॅमेरा आणि 12GB RAM असलेला Redmi Note 13 Pro आता 20 हजारांत
- 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला Samsung स्मार्टफोन मिळतोय इतका स्वस्त