भाजपमुळे देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक : आ. डॉ. तांबे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : आज जे स्वार्थी लोक पक्षांतर करत आहेत ते कुठेच टिकणार नाहीत. काँग्रेस पक्षातून असे लोक बाहेर पडत असले तरी पक्ष पुन्हा मोठ्या ताकदीने उभा राहणार आहे. काँग्रेस पक्षाची उभारणी सामाजिक चळवळीतून झालेली असून याच चळवळीच्या माध्यमातून पक्षाने देशात काम केले आहे.

आज देशावर मोठे संकट आलेले असून जेव्हा लोकांना हे संकट समजेल तेव्हा देश उध्वस्त झालेला असेल. त्यामुळे देशावर आलेले भाजप सरकारचे संकट तळागाळातील लोकांना समजून सांगावे. भाजपमुळे देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक बनल्याचे प्रतिपादन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण गुरुवारी (दि.२९) पार पडले. यावेळी आ. तांबे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा. दादा पाटील शेळके होते. कार्यक्रमास पक्षाचे निरीक्षक योगेंद्र पाटील,

जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, तालुकाध्यक्ष संपत म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य प्रताप शेळके, ज्ञानदेव वाफारे, दादासाहेब मुंडे, सुनीता ढगे, आबासाहेब कोकाटे, बाळासाहेब गुंजाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.. पुढे बोलताना आ. तांबे म्हणाले, आपला देश तत्वप्रणालीवर चालणारा आहे.

देशात आतापर्यंत जे बदल घडून आले आहेत ते केवळ काँग्रेसमुळेच घडले आहेत. परंतु भाजप-शिवसेनेची सत्ता केंद्रात आणि राज्यात आल्यापासून अनेक चांगल्या योजना बंद झाल्या आहेत. काँग्रेसने आणलेल्या योजनांची नावे बदलून त्या राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment