नगर : आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादी सोडण्याच्या विचारात असून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुरू असलेली चर्चा अजूनही सुरूच आहे.
आ. जगताप हे मात्र त्याचा इन्कार करतात. पण आमदार जगताप जर शिवसेनेत आले तर त्यांची उमेदवारी निश्चित असल्याची शक्यता गृहीत धरून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासाठी शिवसैनिक सरसावले आहेत. केडगावातील हत्याकांडात दोघा शिवसैनिकांचे प्राण गेले.

त्याला आमदार जगताप हेच जबाबदार असल्याची भावना शिवसैनिकांची आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये असा ठराव शिवालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला. याशिवाय अनिल राठोड यांनाच उमेदवारी देण्याचा एकमुखी ठरावही त्यात आहे.
या ठरावातून राठोड यांनी विरोधक आमदार जगताप यांच्यासोबतच पक्षांतर्गत स्पर्धक शीला अनिल शिंदे आणि संभाजी कदम यांचाही पत्ता कट करण्याची चाल खेळल्याची चर्चा आहे. या ठरावावर नगरसेवक व शिवसैनिकांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. तो ‘मातोश्री’ वर धाडणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
- अगदी घरी बसून येईल तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स; प्रत्येक दुरूस्तीही होते घरच्याघरी, कशी? तर वाचा
- 10 रुपयांच्या कॉइनबाबत रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून नवीन गाईडलाईन जारी ! समोर आली मोठी अपडेट
- घरी बसून पेन्शन घ्यायचीय? मग सरकारच्या ‘या’ योजनेची माहिती तुम्हाला हवीच; 1 लाखांपर्यंत मिळेल पेन्शन
- लग्नासाठी कर्ज कोण देतं? अटी काय असतात? कागदपत्रे कोणती लागतात? वाचा सगळी माहिती
- तुमच्या घरावरुन कुणाचं विमान उडतंय..भारताचं की दुश्मनाचं? एका क्लिकमध्ये ‘असं’ करा चेक