करंजी : पाथर्डी-नगर तालुक्यातील विविध गावच्या विकास कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांच्या माध्यमातुन सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले. करंजी येथील भावलेवस्ती रस्ता, तिसगाव येथील गारूडकर वस्ती रस्ता, शिराळ मारूती मंदिर सभामंडप, करडवाडी घाटशिरस जुना मढीरस्ता,

चिचोंडी मिलखेवस्ती रस्ता, कडगाव तांबोळीवस्ती रस्ता, मोहजखुर्द मिरी रस्ता, धारवाडी मोहटादेवी मंदिर सभामंडप, त्रिभुनवाडी कारखेले वस्ती रस्ता, शंकरवाडी वांढेकरवस्ती सभामंडप, कोल्हार लक्ष्मीमाता मंदिर सभामंडप, गीतेवाडी विठ्ठल मंदिर सभामंडप, मोहजबुद्रुक पाण्याची टाकी बांधणे असा एकुण १ कोटी २३ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
दिर सभामंडप, त्रिभुनवाडी कारखेले वस्ती रस्ता, शंकरवाडी वांढेकरवस्ती सभामंडप, कोल्हार लक्ष्मीमाता मंदिर सभामंडप, गीतेवाडी विठ्ठल मंदिर सभामंडप, मोहजबुद्रुक पाण्याची टाकी बांधणे असा एकुण १ कोटी २३ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
तर नगर तालूक्यातील आव्हाडवाडी रस्ता खडीकरण, पांगरमल भैरवनाथ मंदिर सभामंडप, रस्ता काँक्रीटीकरण करणे, जेऊर अंतर्गत रस्ते काँटीकरण करणे, धनगरवाडी अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे, पिंपळगाव माळवी गुंड रस्ता काँक्रीटीकरण करणे,
शेंडीरस्ता काँक्रीटीकरण करणे, पोखर्डी रस्ता कॉंक्रीटीकरण करणे, दरेवाडी रस्ता कॉंक्रीटीकरण करणे, मांजरसुंबा रस्ता काँक्रीटीकरण करणे, नागरदेवळे तपेश्वर रस्ता काँक्रीटीकरण करणे, मिलींदवस्ती रस्ता काँक्रीटीकरण करणे, बुऱ्हानगर येथील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे, वडारवाडी वैदय कॉलणी रस्ता काँक्रीटीकरण करणे असा एकुण १ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती आ.कर्डिले यांनी दिली.
- Dental Health : पिवळसर दातांवर घरबसल्या इलाज! ही फळं खाल्लीत तर दात होतील पांढरेशुभ्र!
- Brush Tips : दात घासताना किती टूथपेस्ट वापरली पाहिजे ? एक चूक तुमचे दात कायमचे खराब करू शकते…
- शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड व आठ वाहनतळ उभारण्यास मान्यता
- UIIC Apprentice Jobs 2025:पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! इन्शुरन्स कंपनीत मोठी भरती सुरू
- मे महिना मुंबईकरांसाठी ठरणार स्पेशल ! 06 मे 2025 पासून ‘या’ मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, 13 Railway Station वर थांबणार