पारनेर : शहरातील क्रीडा संकुलात विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी साडेचार कोटींचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात येणार आहे. आमदार नीलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तालुकास्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
लंके यांच्याकडेही त्यासंदर्भात तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी क्रीडा संकुलातच बैठक घेत विविध प्रश्नांचा आढावा घेतला.
क्रीडा संकुुलात कायमस्वरूपी जॉगिंग ट्रॅक तयार करावा, महिला व पुरुषांच्या व्यायामशाळेत अत्याधुनिक दर्जाचे साहित्य देण्यात यावे, अशी मागणी भालेकर यांनी केली. संकुलातील गैरसोयी दूर करण्याचे आश्वासन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी दिले.
बैठकीस उपस्थित असलेल्या वास्तुविशारदाने सुमारे साडेचार कोटींचा आराखडा येत्या काही दिवसांत सादर करण्याचे मान्य केले. या आराखड्यास मंत्रालयातून मंजुरी मिळवून आदर्श क्रीडा संकुुल उभारण्याचा मनोदय लंके यांनी व्यक्त केला.