घरातल्या पंख्याला गळफास घेत एकाची आत्महत्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- सोनई येथील दतात्रय जगन फुलारे ( वय – ३५ रा. अंबिकानगर, सोनई, ता. नेवासा, जि. अ. नगर) या युवकाने आज (दि. २०) घरातल्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.

आत्महत्येचं कारण समजू शकलं नसल्याचं सोनई पोलिसांनी सांगितलंय. याप्रकरणी पांडूरंग शिंदे यांच्या खबरेवरुन अकस्मात मृृृृत्युच्या घटनेची नोंद करण्यात आली. घटनेची माहिती समजताच सपोनि करपे आणि अन्य पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

पंचनाम्यानंतर मयताचा मृृृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान, आत्महत्येच्या या घटनेवरुन अंबिकानगर परिसरात उलटसुलट चर्चेला खूपच उधाण आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe