अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत.
परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळणे फायद्याचे ठरणार आहे.
असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी लॉकडाऊनवरही टोपे यांनी आपले स्पष्ट मत मांडले.आरोग्यमंत्री जालना येथे जात असताना काही वेळ नगरच्या शासकीय विश्रामगृहावर थांबले होते.
यावेळी माध्यमांशी ते बोलत होते. लॉकडाऊनसंदर्भात बोलताना ते म्हणाले, ‘एखाद्या जिल्ह्यातील बेडची क्षमता संपत आली व ही क्षमता वाढवायची असेल, तर अशा वेळी जनता कर्फ्यू करण्याचा फायदा होतो.
जनता कर्फ्यूमुळे लोक घरात थांबल्याने संक्रमण थांबते, दुसरा फायदा म्हणजे बंदच्या काळात आरोग्य सुविधा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कालावधी मिळतो.
त्यामुळे जेथे जेथे स्थानिक प्रशासन, तेथील पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांना वाटत असेल, त्याठिकाणी ते छोट्या कालावधीचा जनता कर्फ्यू करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर विचार करणे योग्य आहे. परंतु संपूर्ण लॉकडाऊन करणे हा आता विषय राहिला नाही. लॉकडाऊन आता होणार नाही असे टोपे यांनी स्पष्ट केले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved