अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- मंगळवारी जिल्हा परिषद मुख्यालयात कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. जिल्हा परिषद सभागृहात यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती.
दिवसभर चाललेल्या तपासणीअंती एकूण २९० कर्मचाऱ्यांपैकी ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
अध्यक्ष राजश्री घुले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सभापती सुनील गडाख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे,
साथरोग अधिकारी दादासाहेब साळुंके, जि. प. कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष विकास साळुंके, सचिव किशोर शिंदे, शिवाजी भिटे यांनी सभागृहात येऊन चाचणी व्यवस्थेची पाहणी केली.
जिल्हा परिषदेत कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी कर्मचारी संघटनेने केलेल्या मागणीनुसार कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
कोरोनाच्या संशयामुळे प्रत्येक जण दबावाखालीच कामावर येत आहे. आता कोरोना चाचणीमुळे हा दबाव कमी होण्यास मदत होईल.
कोरोना रोखण्यासाठी जिल्हा परिषदेची मोठी यंत्रणा कार्यरत आहे. यापरिस्थितीत प्रत्येकानेच योग्य प्रतिबंधात्मक काळजी घेण्याचे आवाहन अध्यक्ष राजश्री घुले यांनी केले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved