पोलिसांचे पुढाऱ्यांसमोर लोटांगण ? नेमके काय झाले वाचा सविस्तर…..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्यावर अरेरावी, शिवीगाळप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल करणारे पोलीस कॉन्स्टेबल संदीप पितळे यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात एका बैठकीत घेण्यात आला.

पोलिसांना पोलिस निरीक्षकाला शिव्या देणाऱ्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांविरोधात पोलिसांनी अक्षरश: लोटांगण घातले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांची बैठक राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांच्या निवास्थानी झाली.

यात समोपचाराने भूमिका घेण्याचे ठरविण्यात आला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी आणासाहेब शेलार यांच्या फोनवरून पोलीस कॉन्स्टेबल संदीप पितळे यांना फोन लावून पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते.

यावरून भोस यांच्या विरोधात पितळे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी उपविभागीय पोलिस अधिकारी संजयकुमार सातव यांनी भोस यांची भेट घेतली.

यावेळी पोलीस निरीक्षक जाधव यांना तिथे बोलावण्यात आले. राष्ट्रवादी नेते घनश्याम शेलार,आण्णासाहेब शेलार, मनोहर पोटे, दीपक भोसले आदींच्या उपस्थितीत ही बैठक सकाळी दहा वाजता झाली.

यानंतर भोस यांनी आपण चाळीस वर्षे सामाजिक कामात आहोत मात्र अशी वेळ आली नव्हती, असे सांगत ज्या पोलीस कॉन्स्टेबलने तक्रार दिली त्याची बदली करावी, असे भोस यांनी सांगितले.

उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, भोस आणि पोलीस निरीक्षक यांची समोरासमोर भेट व चर्चा झाली.

दोन्ही बाजूने गैरसमज दूर करण्यासाठी आपण मध्यस्थी केली. दोन्ही बाजूने दिलगिरी व्यक्त करण्यात आली. पुढारी आणि पोलीस यांचे कायम चांगले काम असते सामाजिक कामात देखील ते पुढे असतात.

आता प्रकरण मिटले आहे. मात्र पोलीस कॉन्स्टेबल संदिप पितळे यांच्या बाबत तक्रारी असल्याने त्याची सध्या उपविभागात बदली करणार असल्याचे सातव यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment