रणरागिणींनी उद्ध्वस्तकेला अवैध गावठी दारूचा अड्डा !

Ahmednagarlive24
Published:

नेवासे :- तालुक्यातील मुकिंदपूर येथे अनेक दिवसांपासून खुलेआमपणे सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा स्थानिक महिला बचत गटाच्या रणरागिनींनी एकत्र येत नेवासे पोलिसांच्या मदतीने उद्ध्वस्त केला.

मुकिंदपूर येथील गट नंबर ७६ मधील सुरेखा चव्हाण यांच्या येथे चालू असलेला गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याने या परिसरात तळीरामांचा उपद्रव वाढला होता.

तळीरामांच्या आरडाओरड तसेच अश्लील भाषेतील शिव्यांनी महिलांची कुचंबणा होत होती. या सर्व प्रकारांना कंटाळून स्थानिक महिला बचत गटाच्या सुमन इंगळे, प्रभावती बोर्डे यांच्यासह शेकडो महिलांनी एकत्र येत गावठी अड्डा उद्ध्वस्त केला.

याबाबत त्यांनी नेवासे पोलिसांना कल्पना देऊन बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. पोलिसांना येण्यास उशीर होत असल्याचे पाहून संतप्त महिलांनी गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला.

घटनेची माहिती मिळच नेवाशाचे पोलिस उपनिरीक्षक भरत दाते, होमगार्ड मोहन गायकवाड, कॉन्स्टेबल वशिम इनामदार यांनी घटनास्थळी येऊन दारू बनवण्याचे बॅरल उद्ध्वस्त केले.

यावेळी उपस्थित महिलांनी पोलिस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. एवढा मोठा दारूचा व्यवसाय या ठिकाणी चालू असतानाही पोलिसांना याबाबत माहिती कशी नाही?

असा प्रश्न येथील महिलांनी उपस्थित केला. दारू अड्डाचालक महिला सुरेखा चव्हाण तिची मुलगी व आई यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिस स्टेशनला नेण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment