अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुका महाविकास आघाडी व नगर शहर शिवसेनेचा आयुक्तांच्या दालनात ठिय्या अहमदनगर:माजी खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजार समिती सत्ताधार्यांनी अनधिकृतपणे बांधलेले २९ गाळे पाडण्याच्या मागणीसाठी नगर तालुका महाविकास आघाडी व नगर शहर शिवसेनेच्यावतीने आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
अनधिकृत गाळे पाडण्याबाबतचे निवेदन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना देण्यात आले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
नगर बाजार समितीतील भूखंड क्रमांक 17, 20, 22, 23 या एकत्रित जागेच्या मंजूर रेखांकनातील खुल्या जागेत नगर कृषी उत्पन्न बाजार समितीने विनापरवानगी दुकानांचे बांधकाम केलेे आहे.
तत्कालिन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांनी हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस बजावल्यानंतर बाजार समितीने नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांकडे अपिल केले होते.
दि. 15 जुलै 2019 रोजी नगर विकास विभागाने अपिल फेटाळले. असे असतांनाही महापालिकेने अद्याप अनधिकृत गाळे पाडलेले नाहीत.
आठ दिवसांत त्वरित कार्यवाही न झाल्यास नगर तालुका विकास आघाडीच्यावतीने जिल्हाप्रमुख प्रा. गाडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, बाळासाहेब हराळ, संभाजी कदम, अनिल शिंदे, संजय शेंडगे, नगरसेवक योगीराज गाडे, दत्ता कावरे, मदन आढाव,
नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, प्रशांत गायकवाड, शाम नळकांडे, संग्राम कोतकर, उपसभापती रविंद्र भापकर, केशवराव बेरड, रामदास भोर सह आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved