पोलीस कॉलनीतून वाळू तस्कराने ट्रॅक्टर पळविला !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर: शहरातील पोलीस कॉलनीत महसूल विभागाने अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना ट्रॅक्टर ट्रॅालीसह पकडून आणून लावला होता,पण वाळू तस्कराने तो ट्रॅक्टर ट्रॉलीसह पळवून नेल्याची घटना रविवारी (दि. १९) दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरुडी पठार येथील तलाठी राजू पांडुरंग ताजणे व के. बी. शिरोळे या दोघांना डोळासणे मंडळातील अवैध वाळू उपसा प्रतिबंधात्मक पथकामध्ये नेमले होते.

त्यामुळे हे दोघे शनिवारी (दि. १८) रात्री दहा वाजेच्या सुमारास संगमनेर कार्यक्षेत्रात दुचाकीवरून अकोले रोडने संगमनेरकडे येत असताना एक विना क्रमांक ट्रॅक्टरमध्ये तीन हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू आढळून आली. तलाठ्यांनी ट्रॅक्टर चालकास नाव विचारले असता इम्रान पठाण (रा. भरड वस्ती, अकोले नाका, संगमनेर) असे सांगितले. एकूण १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हा ट्रॅक्टर शहरातील पोलीस कॉलनीत लावला होता. रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वाळू तस्कराने ट्रॅक्टर पळवून नेला आहे. याप्रकरणी तलाठी राजू ताजणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी ट्रॅक्टर चालक इम्रान पठाण व इजाज उर्फ मोट्या मणियार (रा. सय्यदबाबा चौक, संगमनेर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title – Sand trafficker escapes tractor from police colony!

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment