बिबटे पकडण्यासाठी मोलाचे योगदान देणारे संदीप भोसले यांना मिळाली बढती

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यात वनरक्षक या पदावर काम करत असलेल्या संदीप भोसले यांची पारनेर तालुक्यातील सुपा येथे वन परिमंडळ अधिकारी या पदावर (वनपाल) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे .

दरम्यान भोसले यांनी श्रीगोंदा तालुक्यात वनरक्षक या पदावर काम करत असताना कोरेगव्हाण, निंबवी, येळपणे, म्हसे, वडगाव शिंदोडी, ढवळगाव, देवदैठण, राजापूर, या भागात वनीकरण वाढविण्यात मोलाचे योगदान त्यांनी दिले आहे.

तसेच या तालुका परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने येथे मागील काही काळापासून बिबट्याचा वावर वाढला असल्याने त्याच्या बाचावा साठी परिसरातील नागरिकांमध्ये वेळोवेळी जागृती अभियान राबवित,

लोकांमध्ये असलेली बिबट्याची भीती घालवत त्यांनी परिसरात उत्कृष्ट कामगिरी केली आहे .या भागात बिबटे पकडण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

भोसले यांची वन परिमंडळ अधिकारी या पदावर (वनपाल) पदावर नियुक्ती झाली असल्याने श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांमधून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment