शनिशिंगणापूर देवस्थान आज रात्रीपासून राहणार बंद

Published on -

नेवासा : तालुक्यातील शनिशिंगणापूर देवस्थानही आज रात्रीपासून राहणार बंद कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून शनीदेवाचे दर्शन भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शनैश्वर देवस्थान प्रशासनाकडून लवकरच निर्णय जाहीर होणार आहे.

भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी शनीदेवाची पूजा , आरती तसेच दैनंदिन विधी नियमीत सुरू असणार आहे . कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी धार्मिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आवाहन शासनाकडून केले होते. सोमवारपासूनच शनीभक्तांची गर्दी कमी झाली होती.

दर्शन बंदीमुळे मात्र भाविकांबरोबर , व्यावसायिकतेवर कोरोनाची साडेसाती लागली आहे . मंगळवारी सकाळपासून पूजा साहित्य दुकानावर , हॉटेल व्यावसायिकांच्या दुकानावर शुकशुकाट दिसून येत होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News