अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- महिलांची छेडछाड, अत्याचार, विनयभंग यासारख्या घटनांमुळे नगर जिल्ह्यातील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील स्वांडवे येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, विलास विठोबा तापकीर,
विशाल विठोबा लापकीर या दोघांनी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस तुला विहीर दाखविण्यासाठी नेतो असे म्हणून सोबत घेऊन गेले.
विहिरीला बांधलेला दोर सोड असे मुलीला सांगितल्यानंतर मुलगी ते दावे सोडत असताना तिला पाठीपागून धरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन सादर पीडितेचा विनयभंग केला.
मुलीने विरोध करताच दुसऱ्या आरोपीने दमदाटी केली. अल्पवयीन विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आरोपी विलास विठोखा लापकीर व विशाल तापकीर या दोघाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
विलास तापकीर याला अटक करण्यात आली असुन पोसई शिरसाठ हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved