सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या लशीवर दावा दाखल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या वतीने “कोविशील्ड’नावाची कोविडवरील लस तयार होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर नांदेडच्या न्यायालयात सीरम इन्स्टिट्यूटविरुद्ध दिवाणी दावा दाखल करण्यात आला आहे.

नांदेडमध्ये क्युटिक्स बायोटेक नावाची कंपनी आहे, जी विविध औषधी निर्माण करते. कंपनीच्या मालक अर्चना आशिष काबरा आहेत.

कंपनीच्या वतीने उत्पादन होणाऱ्या औषधींमध्ये एक नाव “कोविशील्ड’ आणि ‘कोविडशील्ड’ हा ट्रेडमार्क आमचा असून त्याचा इतर कोणी वापर करू नये, असा दावा दाखल केला आहे.

त्यांनी २० एप्रिल २०२० मध्ये भारताच्या व्यापारचिन्ह नोंदणी कार्यालयात “कोविशील्ड’ नावाच्या सॅनिटायझरसाठी व्यापार चिन्हाकडे (ट्रेडमार्क) नोंदणी केली आहे.

त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटने “कोविशिल्ड’ नावाने आम्ही कोविड लस काढणार आहोत, असे जाहीर केले. त्यासाठी त्यांनी सुद्धा दिल्ली येथील व्यापार चिन्ह (ट्रेडमार्क) नोंदणी करणे अर्ज केला.

या अर्जावर क्युटिक्स बायोटेक कंपनीने ११ जुलै २०२० रोजी “कोविशील्ड’ हे नाव आम्ही अगोदरच सादर केले आहे, असा आक्षेप घेतला. पण, त्यावर व्यापार चिन्ह नोंदणी कार्यालयाने कोणताही अंतिम निर्णय घेतला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment