शिर्डी नगरपंचायतीला मिळणार नवीन उपनगराध्यक्ष

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून शिर्डी मध्ये खूप चर्चात्मक गोष्टी घडत आहे. नुकत्याच ड्रेसकोड च्या वादामुळे शिर्डी प्रशासन चांगलेच चर्चेत होते. आता या सर्वानंतर शिर्डी मध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.

शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी नुकतीच शिवाजी अमृतराव गोदंकर यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

त्यामुळे आता नवीन उपनगराध्यक्ष शिर्डी नगरपंचायतीला मिळणार आहे. नवीन उपनगराध्यक्षच्या चुरशीमध्ये आता अशोक गोंदकर, सचिन कोते व दत्तू कोते या तिघांची नावे आघाडीवर आहेत.

त्यामुळे उपनगराध्यक्षपदही आता शिर्डी नगरपंचायतचे रिकामे झाले असून त्यावर लवकरच उपनगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागते याकडे आता संपूर्ण शिर्डीकरांचे लक्ष लागून आहे.

शिर्डी नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी नगरसेवक अशोक गोदंकर, तसेच सचिन कोते, दत्तू कोते या तिघांची नावे आघाडीवर आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment