राहुरी : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसव काँग्रेस आघाडीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आमदार अरुण जगताप किंवा आमदार संग्राम जगताप यांना दिली तरी आपल्यासमोर कोणतेही धर्मसंकट नाही.
आपण भारतीय जनता पक्षाबरोबरच आहोत. नातेसंबधांना प्राधान्य देण्याचा प्रश्नच नाही असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी आज स्पष्ट केले.
काँग्रेस चे युवानेते डॉ. सुजय विखेंचा नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला आहे. या सर्व विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी माझे वर पूर्णविश्वास दाखविला.
हा निर्णय जरी वरीष्ठपातळीवर झाला असला तरी माझे वर या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी टाकलेली होती. मुंबईत प्रवेश प्रक्रियेत देखील मला पूर्ण पणे विश्वासात घेतले गेले.
आज कोणी काहीही संशय घेतले तरीही लोकसभा निवडणूक निकालाने माझ्या पक्षाला महत्व देण्याच्या भुमिकेवरच शिक्कामोर्तब झालेले असेलच. तो पर्यंत चर्चा होतच राहतील.
पक्षात माझे विषयी गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न निश्चित च असफल होतील. माझा कोणताही सोयरा राष्ट्रवादी चा ऊमेदवार असला तरी मी भारतीय जनता पक्षाचे ऊमेदवारा सोबतच आहे असेही आमदार कर्डिलेयांनी स्पष्टकेले. माझ्या याभुमिकेतूनच मी कथित धर्मसंकटावर मात करीन असे ते म्हणाले.