अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली जारी करण्यात आली असून हे नियम पाळणे सर्वाना बंधनकारक आहे. मात्र अशाच या नियमांना डावलणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
पारनेर शहरामध्ये दोन दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स पालन न केल्याने व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन न केल्यामुळे या दुकानावर कारवाई करत तहसीलदार ज्योती देवरे यांनी दुकाने सील केले आहेत.

शहरातील स्वामी झेरॉक्स व किटली चहा सेंटर या दुकानांवर कारवाई करत हि दुकाने सील केली आहे. शहरातील ज्या दुकानांमध्ये सॅनिटायझर चा वापर करत नाहीत, निर्जंतुकीकरण फवारणी केली जात नाही,
काउंटर वारंवार साफ केले जात नाही. सोशल डिस्टन्स चे पालन न करणे, दुकानांसमोर काहीतरी अटकाव केला नसेल दुकानांसमोर चौकोन आखून ठरावीक अंतरावर ग्राहकांना उभे केले,
अशा प्रकारची दुकाने निदर्शनास आल्यास त्वरित सील करण्यात येतील, या दुकानदारांना कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे तहसिलदार ज्योती देवरे यांनी सांगितले आहे. या कारवाईने व्यवसायिकांमध्ये खळबळी उडाली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved