सोळा वर्षांच्या मुलीचा विनयभंग, तिघांना अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- कोपरगाव शहरातील दत्तनगर भागात राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीचा मोद्या मंजुळ, सोन्या मंजुळ, गटर मंजुळ, विशाल गायकवाड यांनी विनयभंग केला. ही घटना १८ ला रात्री घडली.

संबंधित दोन बहिणी सार्वजनिक शौचालयात गेल्या असता चौघा आरोपींनी त्यांच्याशी लगट करून हात धरून ओढले. फिर्यादी व तिची बहीण शौचालयात पळत गेल्यावर

आरोपींनी त्यांच्या पाठीमागे जाऊन शौचालयाच्या दरवाजावर थापा मारून दार उघडा, असे म्हणून दमदाटी केली. या घटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या लोकांवर दगडफेक केली. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक फरार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment