अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- कोरोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
या वाढत्या आणि जास्त रुग्णसंख्येला ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी राज्याने महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात जे काही ऑक्सिजन उत्पादित करणारे प्लांट आहेत, यापूर्वी त्यात उत्पादन होणाऱ्या ऑक्सिजनपैकी ८० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा हा अन्य उद्योगांना होत होता,
तर कोरोना साथ येण्याआधी केवळ २० टक्केच ऑक्सिजनचा पुरवठा मेडिकलसाठी केला जात होता. यात आता बदल करण्यात आला असून
एकूण ऑक्सिजन उत्पादनाच्या ८० टक्के पुरवठा आता मेडिकलसाठी व २० टक्के पुरवठा उद्योगांसाठी करावा, असे निश्चित करण्यात आले आहे. हे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना बाधित व अन्य रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. आरोग्यमंत्री जालना येथे जात असताना काही वेळ नगरच्या शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली.
ऑक्सिजनची आता ‘वॉर रुम’ रूम:- प्रत्येक जिल्ह्यात व्यवस्थित ऑक्सिजन पोहोच व्हावा, यासाठी एक ‘वॉर रूम’ तयार केली आहे. ‘ऑक्सिजनचे उत्पादन होणारी जी ठिकाणे आहेत, तेथून ऑक्सिजन सर्वत्र व्यवस्थित पोहोच याद्वारे केला जाणार आहे.
‘ह्यांच्याकडे’ नियोजन :- या ‘वॉर रुम’ साठी अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग व आरटीओ विभाग येथील अधिकारी नियुक्त केले आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जेथे ऑक्सिजन प्लांट आहेत, त्याठिकाणी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.
या अधिकाऱ्याला केवळ संबंधित प्लांटमधून ऑक्सिजन उद्योगांना न जाता कुठल्याही परिस्थितीत हॉस्पिटलला गेला पाहिजे, त्यादृष्टीने बारकाईने लक्ष देण्याची जबाबदारी दिली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved