अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- मुलीचा सांभाळ करून तिचे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर गेली तिन वर्षे बलात्कार तसेच अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधामास पारनेर पोलिसांनी अटक केली आहे.
यासंदर्भात पिडीतेने पारनेर पोलिस ठाण्यात येउन फिर्याद दाखल केली आहे. गेल्या २०१७ पासून रावसाहेब विनायक विधाटे रा. म्हैसगाव आग्रेवाडी,
ता. राहुरी हा मुलीच्या लग्नाच्या, तिला सांभाळण्याच्या बहाण्याने फिर्यादी पिडीतेस तिच्या संमतीशिवाय पळशी ता. पारनेर येथे तसेच म्हैसगांव आग्रेवाडी ता. राहुरी येथे वेळोवेळी शारीरीक सबंध ठेउन बलात्कार करायचा.
अनैसर्गिक कृत्येही करण्यास भाग पाडायचा. त्यास विरोध केल्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण करायचा. फिर्यादीच्या मुलीने दवाखान्यातील उपचारासाठी पैशांची मागणी केली असता
आरोपीने शिविगाळ करून तुझा व माझा काही सबंध नाही तू तुझ्या घरी निघून जा. माइ-या विरोधात कुठे तक्रार केली तर तुला व तुइ-या आईलला जिवंत ठेवणार नाही
अशी धमकीही दिली. पिडीतीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रावसाहेब विधाटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येउन त्यास अटक करण्यात आली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved