अभिवचन रजा संपल्यानंतर पसार झालेला आरोपी जेरबंद कोर्टाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अभिवचन रजा संपल्यावर हजर न होता परस्पर पसार झाला होता.

मात्र  जामखेड पोलिसांनी (दि.७ रोजी) पूणे येथुन मोठ्या शिताफीने त्याला जेरबंद करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

रामकिसन उत्तम साठे (वय ५० रा.जवळके ता.जामखेड) असे त्या आरोपीचे नाव आहे. रामकिसन उत्तम साठे यास सेशन कोर्ट अहमदनगर यांनी ३०२ च्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.

शिक्षा भोगत असताना सदर आरोपी हा आपले मुळगावी जवळके  येथे अभिवचन रजेवर आला होता. अभिवचन रजा संपल्यानंतर तो कारागृहात हजर न होता पसार झाला होता.

त्यावरून येरवडा जेल येथील पोलिसांनी जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान (दि. ७ जाने रोजी) पो.नि.संभाजी गायकवाड यांना रामकिसन उत्तम साठे हा विठ्ठलवाडी येथे आपली ओळख लपवुन राहत आहे.

अशी खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराने दिल. या माहितीनुसार पोनि.संभाजी गायकवाड यांनी याबाबत वरीष्ठांना कळवुन तपास पथकास या­ठिकाणी जाण्यास कळविले होते.

तपास पथकातील पोलीस अंमलदार हे तात्काळ रवाना होवुन देहु रोड पोलीस स्टेशनची मदत घेवुन मिळालेल्या माहितीच्या संबंधित ठिकाणी सापळा रचून उत्तम साठे यास ताब्यात घेण्यात घेवुन

जामखेड पेालीस स्टेशनला आणले. दि ८ रोजी.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जामखेड यांचेसमोर हजर केले असता, न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment