जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा हजारांच्या जवळपास

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना नावाचे संकट जगभर अद्यापही कायम आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

यातच दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातही याचा चांगलाच प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळाला आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनामुळे आणखी १३ जणांचा मृत्यू झाला, यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या जिल्ह्यातील बळींची संख्या ९८९ झाली आहे.

पाच महिन्यांत प्रथमच जिल्ह्यात सर्वात कमी १२३ रुग्ण आढळले आहे. दरम्यान जिल्ह्यातील मृतांचा आकडा हजारांच्या जवळपास पोहचला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असले तरी नागरिकांनी नियमांचे पालन करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe