अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-‘महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष हे सत्तेसाठी एकत्र आले आहेत. सत्तेसाठी एकत्र आलेली माणसे सत्ता टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. या सरकारने जावे, अशी आमची घाई नाही.
भाजपलाही सरकार पडावे, असे अजिबात वाटत नाही. राज्य चालले पाहिजे. चांगले चालले पाहिजे. मात्र दुर्दैवाने ते चालत नाही. त्यामुळे राज्य सरकार हे त्यांचा काळ तेच भरून टाकतील व जेव्हा त्यांचे सरकार पडेल तेव्हा आम्ही मागणी करू,’ असे भाजप नेते माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी स्पष्ट केले.
‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे दुर्दैवाने जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सक्षम आहे, असे वाटत नसल्याचे ते म्हणाले. भाजप कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिरासाठी पाचपुते हे नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारवर निशाणा साधला. राज्यातील सरकारने अनेक घोटाळे करून ठेवले आहेत.
कोविड सेंटर काढले, त्यामध्ये सुद्धा लाखो रुपयांचा, कोट्यवधीचा भ्रष्टाचार आहे. केंद्र सरकारने दिलेली मदत लोकांपर्यंत पोहोचत नाही. कोविडमध्ये मृत्यूचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर झाले आहे. असे पाचपुते म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved