अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील संदीप बोरगे यांच्या ‘ खरे शिक्षक ‘ कवितेने संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे .
औरंगाबाद येथील एकत्व ग्रुप तर्फे आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन काव्य स्पर्धेत मुंबई , पुणे , नाशिक,रत्नागिरी ,परभणी,जळगाव, यवतमाळ तसेच कर्नाटक आणि बेंगलोर अशा बाहेरील राज्यातून स्पर्धेसाठी एकुण ९७४ कविता आल्या होत्या.
सध्या सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे संदीप बोरगे यांची ‘ खरे शिक्षक ‘ कविता सर्वोत्तम ठरून द्वितीय क्रमांक पटकावून गेली .
प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह असे बक्षिसाचे स्वरूप आहे. कवी,लेखक अशोक कौतिक कोळी व गझलकार राजू आठवले यांनी परीक्षक म्हणुन काम केले.
स्पर्धेचे आयोजक कवी धनंजय गव्हाले,कवी पवन ठाकुर,गझलकार परवेझ शेख यांनी यशस्वी आयोजन केले .बोरगे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved