रब्बीच्या पेरण्या लांबल्या; अवघ्या ‘इतक्या’ हेक्टरवर पेरण्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडत असल्याने रबी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. वावरांमध्ये पाणी साचले असल्याने पेरणी करणे अशक्य झाले आहे.

जिल्ह्यात मुख्यत: धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर तसेच सिंचनाची सुविधा नसलेल्या वावरात काही शेतकरी रबी पिकांची लागवड करतात.

रबी पिकांमध्ये प्रामुख्याने उडीद, हरभरा, ज्वारी, मका, गहू आदी पिकांचा समावेश आहे. या पिकांची पेरणी प्रामुख्याने ऑक्टोबर महिन्यात सुरु केली जाते.

परंतु अहमदनगर जिल्ह्यामधील अनके तालुक्यांमध्ये पाऊस पडत असल्याने रब्बी हंगामासाठी पेरण्या खुपच लांबत चालल्या असल्याने शेतकर्‍यांना चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी आतापर्यंत अवघ्या 2 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. शेतात साचलेले पाणी अद्याप आटले नसताना पुन्हा पावसाला सुरूवात झाल्याने आता शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली आहे.

यंदा गेल्या दोन महिने सलग पाऊस पडत आहे. आता कुठे आठ ते दहा दिवस पावसाने उघडीप दिली होती. मात्र, शेतातील पावसाने अद्याप आटलेले नसल्याने रब्बी हंगामाासाठी अद्याप पेरण्या सुरू झालेल्या नाहीत.

जिल्ह्यात अनेक भागात विशेष करून गोकुळ अष्टीनंतर ज्वारीच्या पेरण्याला सुरूवात होत असते. यंदा पावसामुळे या पेरण्या होवू शकलेल्या नाहीत.

यंदा रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरण्या साधारणपणे 15 दिवस ते महिनाभर लेट झाल्या आहेत. त्यात आता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने रब्बीसाठी पोषक (पान 4 वर)वातावरण असतांनाही जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी कृषी विभागाच्या नियोजनानूसार पेरण्या पुर्ण होती की नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment