परंपरागत सुरु असलेली माळेच्या मिरवणुकीची प्रथा यंदाच्या वर्षी खंडित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने यंदाच्या वर्षीच्या सर्वच सणउत्सवावर मर्यादा घातल्या आहेत.

गणेश उत्सवापाठोपाठ आलेल्या नवरात्रीच्या उत्सवाला देखील कोरोनाने ग्रासले आहे. यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संगमनेर शहरात नवरात्रात देवीला अर्पण करायची माळ मोठ्या उत्साहात, मिरवणुकीने वाजतगाजत नेण्याची आगळीवेगळी परंपरा आहे.

मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट पाहता केवळ चौघांच्या उपस्थितीत ही परंपरा पाळणार असल्याचे आप्पासाहेब खरे यांनी सांगितले. शहरातील सप्तशृंगी मातेचे पुरातन मंदिर व रेणूका मातेच्या मंदिरात नवरात्रात भाविक गर्दी करतात.

रंगार गल्लीतील सोमेश्वर मंदिरापासून निघणाऱ्या माळेची मोठ्या उत्साहात मिरवणूक निघत असते. घटस्थापनेपासून नऊ दिवस रोज सायंकाळी सहा वाजता निघणाऱ्या मिरवणुकीत अनेक ढोलताशा पथके सहभागी होतात.

मात्र, कोविडमुळे यंदा या सर्व कार्यक्रमांना संगमनेरकर मुकले आहेत. यंदाचे सर्व उत्सव हे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तसेच यंदाच्या वर्षी अनेक ठिकाणी देवीचे दर्शन हे ऑनलाईन तसेच मंदिराच्या बाहेर बसविण्यात येणाऱ्या स्क्रीनवर घेता येणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment