प्रियसीच्या घरी पेटवून घेणाऱ्या त्या युवकाचा मृत्य

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  शिडी शहरात प्रेम प्रकरणातून तरूणाने स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न करून प्रतिष्ठित घराण्यातील मुलगी व तिचे वडिलांनाही जखमी केले.

ही घटना गुरूवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या तरूणाचे मृत्यू झाला आहे. सार्थक वसंत बनसोडे (वय वर्षे २० राहणार साकूरी) असे मयत तरूणाचे नाव आहे

शिर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर राजी सार्थक वसंत बनसोडे (वय २० स. साकुरी, ता.राहाता) याच एका प्रतिष्ठीत घरातील मुली बरोबर प्रेमसंबंध होते

याची कल्पना मुलींच्या घरच्यांना आल्याने त्यांनी या तरूणास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मुलींनीही या प्रेमसंबंधास विरोध दर्शविला होता,

परंतु मयत सार्थक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यामुळे सार्थक याने शिर्डीत मुलीच्या घरापासून काही अंतरावर मोटारसायकल लावून त्याने त्याच्या सोबत आणलेल्या ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या अंगावर ओतुन स्वतःला पेटवून घेतले.

स्वत: आत्महत्या करताना त्याने मुलीसह तिच्या वडिलांना मिठी मारून इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला असुन यामध्ये सार्थक बनसोडे, मुलगी तसेच तिची बहीण तिघेही गंभीर जखमी झाले आहे.

या तिघांनाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले उपचार चालू असताना गुरूवारी रात्री सार्थकाचा मृत्यू झाला. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून

आरोपी सार्थक बनसोडे याच्या विरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ‘पोलिसांच्या फिर्यादीवरून मयत सार्थक याच्या विरूद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment