अहमदनगर जिल्ह्यातील हे धरण तब्बल दहा वर्षानंतर भरले !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-  तब्बल १० वर्षानंतर पारनेर तालुक्यातील काळू धरण गुरुवारी (३० जुलै) ओव्हरफ्लो झाले. यामुळे ढवळपुरी व परिसरातील गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा काळू प्रकल्प पावसाळ्याच्या सुरूवातीला भरल्याने शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. काळू प्रकल्प झाल्यानंतर ओव्हरफ्लो होण्याची आतापर्यंतची ही तिसरी वेळ आहे,

अशी माहिती शाखा अभियंता भाऊसाहेब घनदाट यांनी दिली. पारनेर तालुक्यातील काळू धरणाची एकूण साठवण क्षमता २९९ दशलक्ष घनफूट आहे.

या धरणातून ढवळपुरीसह परिसरातील वाड्यावस्त्यांसह अनेक गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय पळशी २९.८२, तिखोल २१.२०, भाळवणी ६.२२, ढोकी नं. १ ६.७७,

ढोकी नं.२ १०.४४ दशलक्ष घनफूट पाणी या तलावात आहे. अजून मोठ्या प्रमाणात आवक होत असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने उर्वरित तलावही लवकरच भरतील, अशी आशा शेतक-यांमधून व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी काळू प्रकल्प २०११ व २०१७ साली पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.

त्यामुळे खरिपाच्या हंगामासह रब्बी हंगामातील पिकांना दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe