अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-कोरोनाचा हाहाकार एकीकडे नगर शहरात झाला असताना आता दुसरीकडे दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या नळावाटे गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून, याचे कारण मुळा धरणात येणाऱे नवीन पाणी असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
क्लोरिन व तुरटीची मात्रा जलशुद्धीकरण प्रक्रियेत वाढवली असली तरी गढूळ पाणी येण्याचे प्रमाण कमी होत नाही, त्यामुळे नागरिकांनीच आता पिण्याचे पाणी उकळून पिण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
नगर शहरात सध्या सगळीकडे गढूळ पाणी पुरवठा होत आहे. नळांवाटे येणारे पाणी गढूळ व मातकट असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महापालिकेकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे.
पण महापालिकेने गढूळ पाण्याचे कारण मुळा धरणात नवीन पाण्याची सुरू झालेली आवक असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेने विळद जलशुद्धीकरण केंद्र व वसंत टेकडी जलकुंभात क्लोरिन व तुरटीची मात्रा वाढवून
पाण्याची गढुळता कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण तरीही पाणी गढूळ राहण्याचे प्रमाण दिसत असल्याने जलजन्य आजाराचा धोका होऊ शकतो.
त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी उकळून घेण्याचे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved