जिल्ह्यातील ‘तो’ तलाव बनला धोकादायक ! तातडीने दुरुस्त करण्याची मागणी…

Published on -

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुक्यातील बहिरवाडी येथे असणारा वाकी तलाव सद्यस्थितीत धोकादायक बनला असून त्याची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र दारकुंडे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दारकुंडे यांनी वाकी येथील पाझर तलाव १९७२ साली बनविण्यात आला असून सद्यस्थितीला तलाव धोकादायक बनलेला आहे.

तरी त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तलाव बनवताना त्याचे काम पूर्ण झालेले नाही त्यामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर काही वेळेस पाणी सांडव्यातून जाण्याऐवजी तलावाच्या भरावा वरून वाहण्याचा प्रकार यापूर्वी घडलेला आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी स्वखर्चाने सांडव्याचे खोलीकरण करून काही प्रमाणात धोका कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाकी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्याद्वारे खारोळी नदीला पाणी सुरू आहे.

आजमितीस तलावाची परिस्थिती धोकादायक असून तलावा खालील इमामपूर, चाफेवाडी, जेऊर परिसरातील वस्त्यांना धोका निर्माण झालेला आहे. पिंपळगाव माळवी तलाव ओव्हरफ्लो असल्याने हा धोका पुढील गावांनाही संभवतो.

तलावाच्या भरावा वर झाडांचा मोठा वेढा पडलेला आहे. तरी परिस्थितीची पाहणी करून तलाव दुरुस्त करण्याची मागणी राजेंद्र दारकुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!