अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :- शहर असो वा गाव ठिकठिकाणी अतिक्रमण ही समस्यां सर्वाना भेडसावत असते. प्रशासनाच्या उदारपणामुळे या गोष्टींना वाव मिळतो. मात्र अशाच एका ठिकाणच्या अतिक्रमणाचा भुर्दंड उपसरपंचाला भोगावा लागला आहे.
नेवासा तालुक्यातील मंगळापूर मधील पानंद रस्त्यावर अतिक्रमण केल्याने मंगळापूर (ता. नेवासे) विद्यमान उपसरपंच पोपट माणिक गव्हाणे यांना ग्रामपंचायत सदस्यपदावर राहण्यास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अपात्र ठरविले आहे.

नेवासे तालुक्यातील मंगळापूर-गळनिंब शिवरस्त्यावर विद्यमान उपसरपंच पोपट गव्हाणे आणि इतरांनी अतिक्रमण केले आहे, अशी तक्रार लिलावती गोविंद झावरे (रा. नेवासा फाटा, ता.नेवासा) यांनी झेडपीच्या सीईओ कडे केली आहे.
अधिकाऱ्यांनी या मंगळापूर-गळनिंब रस्त्याची महसूल अधिकार्यांसमवेत पाहणी केली. यामध्ये मंगळापूरचे विद्यमान उपसरपंच पोपट गव्हाणे आणि इतर 7 शेतकर्यांनी पानंद रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे आढळून आले.
संबंधित अधिकाऱ्यांनी प्राप्त अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केला. त्यानुसार नेवासे पंचायत समितीने उपसरपंच पोपट गव्हाणे यांना अपात्र ठरविण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव पाठविला होता.
जिल्हाधिकार्यांकसमोर या प्रस्तावावर सुनावणी झाली. उपसरपंच गव्हाणे यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध होत असल्याने त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved