जिल्ह्यातील ‘या’ पोलिसांवर कुजलेल्या मृतदेहाची राखण करण्याची वेळ !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- राहुरी तालुक्यात चार दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅक्टरांकडून तपासणीसाठी फाॅरेन्सिक तज्ज्ञाची मदत घेण्याचा सल्ला दिला गेल्याने पोलिस वैतागले.

कणगर हद्दीत नरोडे यांच्या शेतात सोमवारी अज्ञात व्यक्तीचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख,

हेड काॅन्स्टेबल दिनेश आव्हाड यांनी शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅक्टरांशी संपर्क साधला. संबंधित डाॅक्टरने मृतदेह फाॅरेन्सिक तज्ज्ञाकडे न्या, असा सल्ला दिला. मंगळवारी शवविच्छेदन झाले नाही. कुजलेल्या मृतदेहाची राखण करण्याची वेळ पोलिसांवर आली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment