अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ६१२ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १९५ ने वाढ झाली.
यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४१५ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४८, आणि अँटीजेन चाचणीत ९५ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २५, अकोले ०१,जामखेड ०१, कर्जत ०२, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०८, पारनेर ०१,
राहाता ०३, राहुरी ०२,संगमनेर ०७, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४,
अकोले ०३, जामखेड ०१, कर्जत ०१, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०६, पारनेर ०२, राहाता ०३, राहुरी ०२, संगमनेर ०७, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ९५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०६, अकोले ०१, जामखेड ०२, कर्जत १३, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०५, पारनेर ०७, पाथर्डी १६, राहाता ११,
राहुरी ०३, संगमनेर १६, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४९, अकोले १६, जामखेड १०,
कर्जत १०, कोपरगाव ४३, नगर ग्रामीण १३, नेवासा १८, पारनेर ०९, पाथर्डी २१, राहाता १४, राहुरी १०, संगमनेर ४५, शेवगाव १६, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर १३, कॅन्टोन्मेंट ०३, मिलिटरी हॉस्पिटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
- बरे झालेली रुग्ण संख्या:६३६१२
- उपचार सुरू असलेले रूग्ण: १४१५
- मृत्यू:९७४
- एकूण रूग्ण संख्या:६६००१
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com